नवी दिल्ली : लोकांची फसवणूक करुन त्याद्वारे पैसे मिळवणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीबद्दल तुम्ही याआधीही अनेकदा ऐकले असेल मात्र एखाद्या धोकेबाज व्यक्तीने फसवणुकीसाठी तब्बल १०, २० नव्हे तर तीन हजार ७८ बँक अकाउंट्स उघडलेत असं पहिल्यांदाच ऐकत असाल. मात्र हे खरं आहे. गौतम कुंडू असं या व्यक्तीचं नाव असून तो भारतीय आहे.
वॅली ग्रुप नावाच्या कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर असलेले कुंडू यांच्याकडे ७०० एकर जमीनही आहे. १२ विविध राज्यांत ही जमीन विभागलेली आहे. तसेच २३ हॉटेल्सही आहेत. कुंडू यांची संपत्ती पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, आसाम, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे तब्बल १५० लक्झरी कार आहेत.
दरम्यान, विविध ठिकाणच्या फसवणुकींच्या गुन्ह्याखाली कुंडू यांच्याविरोधात तपास सुरु आबे. या वर्षी मार्चमध्ये कुंडू यांना अटक करण्यात आली होती.