जिगोलो मार्केट : जेथे महिला लावतात पुरूषांसाठी बोली

राजधानी दिल्लीत अनेक मार्केट आहेत, लाजपत नगर मार्केट, सरोजनी नगर मार्केट, पालिका मार्केट, पण एक मार्केट धक्कादायक आहे, ते आहे, दिल्लीचं जिगोलो मार्केट. जिगोलो म्हणजे मेल एस्कॉट किंवा कॉल ब्बॉईज.

Updated: Jan 14, 2016, 07:54 PM IST
जिगोलो मार्केट : जेथे महिला लावतात पुरूषांसाठी बोली title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अनेक मार्केट आहेत, लाजपत नगर मार्केट, सरोजनी नगर मार्केट, पालिका मार्केट, पण एक मार्केट धक्कादायक आहे, ते आहे, दिल्लीचं जिगोलो मार्केट. जिगोलो म्हणजे मेल एस्कॉट किंवा कॉल ब्बॉईज.

दिल्लीत काही युवा खुलेआम शरीर विक्रय करण्याचा सौदा करीत आहेत. राजधानी दिल्ली सामसूम होते, तेव्हा जिगोलोचा सौदा सुरू होतो. या जिगोलोपासून सेवा घेणाऱ्या महिला या सॉकॉल्ड पॉश एरियातल्या असतात.

जिगोलोना बुक करण्याचं काम हायफाय, क्लब, पब आणि कॉफी हाऊसमध्ये होतं, एखाद्या कॉर्पोरेट हाऊस प्रमाणे हे काम चालतं, आलेल्या रकमेपैकी जिगोलो आपल्या धन्याला किंवा कंपनीला २० टक्के रक्कम गेतात. 

जिगोलोंची ही सेवा १००० रूपयांपासून ३ हजार रूपयांपर्यंत उपलब्ध केली जाते. पहाटेपर्यंतच्या सेवेसाठी ८ हजारापासून पुढेही घेतले जातात. यात इंजिनियरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी जास्त असल्याचं सांगण्यात येतं, हा बाजार रात्री १० पासून सकाळी ४ पर्यंत चालतो.

साऊथ एक्सटेंशन, आयएनए, अंसल प्लाजा, कनॉट प्लेस, जनकपुरी डिस्ट्रिक सेंटर सारख्या प्रमुख बाजारांजवळ हा बाजार चालतो. गाडी थांबते, जिगोलो बसतो, सौदा होतो, गाडी निघते.