व्हिडिओ: छेडछाड करणाऱ्या तरुणाला तरुणीनं असा शिकवला धडा

बंगळुरुत छेड काढणाऱ्याला एका तरुणीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सूर्यप्रकाश नावाच्या व्यक्तीवर तरुणीसोबत अश्लील भाषेत छेडलं. त्यामुळं रणरागिणी बनलेल्या तरुणीनं सूर्यप्रकाशला चांगलाच चोप दिला. इतकंच नाहीतर त्याला जोरदार किकही लगावली... पोलिसांनी सूर्यप्रकाशला अटक केली... मात्र त्याची जामिनावर सुटका झाली. 

Updated: Aug 11, 2014, 11:40 AM IST
व्हिडिओ: छेडछाड करणाऱ्या तरुणाला तरुणीनं असा शिकवला धडा title=

बंगळुरू: बंगळुरुत छेड काढणाऱ्याला एका तरुणीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सूर्यप्रकाश नावाच्या व्यक्तीवर तरुणीसोबत अश्लील भाषेत छेडलं. त्यामुळं रणरागिणी बनलेल्या तरुणीनं सूर्यप्रकाशला चांगलाच चोप दिला. इतकंच नाहीतर त्याला जोरदार किकही लगावली... पोलिसांनी सूर्यप्रकाशला अटक केली... मात्र त्याची जामिनावर सुटका झाली. 

ही तरूणी मॉर्निंग वॉकला गेली होती. काही वेळानं ती बागेतल्या बेंचवर बसली असता, तिथं दोन तरूण आले. सुरुवातीला ते अश्लील वक्तव्य करत होते. तरुणीनं दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळानंतर तरुणाचा फालतुपणा खूपच वाढला. तो चक्क आपल्या पॅन्टची झिप उघडू लागला. तेव्हा तरुणी उठली तिनं तरुणाला पळवून पळवून मारलं. एक तरुण पळून गेला. मात्र दुसरा तिच्या ताब्यात आला. 

पाहा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.