चेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.

IANS | Updated: Aug 11, 2014, 07:11 AM IST
चेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही title=

चेन्नई: संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.

हा संशयित भारतीय असून न्यू गिनी देशातून आला असून, या नागरिकाला इबोलाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या रूग्णाची तपासणी केल्यानंतर तो पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगण्यात आलंय.

दरम्यान इबोलाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे विमानतळावर आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष वॉच ठेवण्यात येतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.