लग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न

नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.

Updated: Apr 19, 2016, 10:25 AM IST
लग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न title=

ग्वालियर : नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.

नवरदेवाने त्या तरुणीसोबत आश्लिल हारकत केल्यामुळे तिने हे लग्न मोडलं आणि दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हातील कछौआ गांवातून ही घटना समोर आली आहे. फेरे सुरू असतांना नवरदेवाने दारू प्यायली असल्याने नशेत वधूसोबत अश्लिल कृती करायला लागला. त्यामुळे वधूने हे लग्न मोडलं.

वधूने या लग्नाला नकार दिल्याने रविवारी तिचं लग्न एका दुसऱ्या मुलासोबत झालं.