गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Updated: Mar 11, 2017, 10:47 AM IST
गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत  title=

पणजी :  गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. एकूण साडे तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.  या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकांचे कल हाती यायला सुरूवात झाली असून अवघ्या काही तासातच गोव्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ आघाडीवर आहे.