उत्तरप्रदेशात कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री?

Updated: Mar 11, 2017, 10:23 AM IST
उत्तरप्रदेशात कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री?  title=

नवी दिल्ली  :  उत्तरप्रदेशात भाजपने सुरूवातीच्या निकालात बहुमताचा आकडा पार केल्यानंतर आता उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री कोण होणार यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत 

युपीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे :

१. केशव प्रसाद मौर्य :
बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते. संघ परिवाराच्या जवळचे. केशव मौर्य हे मौर्य समाजाचे आहेत. यादव नसलेला ओबीसी चेहरा म्हणून मौर्य यांच्याकडे पहिले जातंय. ते सध्या फूलपूर मतदारसंघातून खासदार आहेत.

२. दिनेश शर्मा :
सध्या लखनौ महापौर आहेत, लखनौ विद्यापीठातील प्राध्यापक. पन्नाशीच्या आतील ब्राम्हण चेहरा. सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. भाजपने १० कोटी सदस्य केले त्या मोहीमेचे प्रमुख.

३. महेश शर्मा : 
सध्या सांस्कृतिक मंत्री असलेले महेश शर्मा सुप्रसिद्ध सर्जन आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ख्याती. 

४. मनोज सिन्हा : 
पूर्वांचल गाजीपूर येथील. बीएचयू मधून आयआयटी झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे टेलिकाॅम मंत्रालय आहे. मोदींच्या जवळचे आहेत. ते भूमिहार जातीचे आहेत.

५. स्मृती इराणी : 
स्मृती इराणी यांनी यापूर्वी युपीतून निवडणूक लढविली आहे. महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे येऊ शकते. स्मृती इराणी वादग्रस्त असल्यामुळे त्यांच्या नावासंदर्भात शक्यता कमी आहे. तरीही मुख्यमंत्री पदाच्या रेसमधील नाव आहे.