www.24taas.com, वृत्तसंस्था, पणजी
गोवा राज्य सरकारी खर्चाने फुटबॉल वर्ल्डकपमधील सामने पाहायला जाणारे तीन मंत्र्यासह 6 आमदारांचा दौरा
चौहोबाजुने टीका झाल्यानंतर रद्द करण्यात आलाय.
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा सामना करत गोव्यातील इच्छुक मंत्री आणि आमदार यांनी ब्राझीलचा दौरा रद्द
करण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलच्या दौऱ्यासाठी 89 लाख खर्च येणार होता. हा खर्च सरकारी तिजोरीवर
पडणार होता. सर्वसामान्यांचा पैसा ब्राझील दौऱ्यासाठी कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
हा `फुकटाचा खर्च` कशासाठी असा हल्लाबोल विरोधकांची चढवला होता.
गोव्यात भाजपचं सरकार आहे. भाजपने लोकांच्या कामासाठी प्राधान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र,
लोकांचा पैसा मंत्री आणि आमदार यांच्या दौऱ्यावर कशासाठी खर्च, असा प्रश्न विचारण्यात येत होता. त्यामुळे
होणारी टीका आणि आपली प्रतिमा जपण्यासाठी तसेच विरोधकांची टीका टाळण्यासाठी हा दौरा रद्द करण्यात
आल्याचे सांगण्यात येत आहे.
गोव्यात फुटबॉलची मोठी क्रेज आहे. गोवेकरांचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. मात्र, खेळाडूंना प्राधान्य न
देता मंत्री आणि आमदार सरकारी खर्चाने जाणार असल्याने टीका होत होती. यावर प्रतिक्रिया देताना गोवा
राज्य सरकारने स्पष्ट केलं की, सर्वसामान्य लोकांचा विचार करुन दौरा रद्दचा निर्णय घेण्यात आलाय.
सरकारने दौरा रद्द केलायं. सर्वसामान्यलोकांचा विचार करुन निर्णय घेण्यात आलायं. स्वत:च्या खर्चाने ते
ब्राझील दौऱ्यावर जाण्यास तयार आहेत असे आमदारांनी सांगितले, असे क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी
स्पष्ट केलं.
सध्यातरी समूहातील पाच जणांना स्वत:च्या खर्चाने ब्राझीलला जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
दौऱ्याला जाणाऱ्या यादी मध्ये स्वत: तावडकर यांचही नाव होतं. ब्राझीलला जाण्याचे कारण की, गोवा राज्य
सरकार राष्ट्रीय खेळासाठी प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रतिनिधीत्व करणार होता. कारण 17 वर्षांखाली होणाऱ्या
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी याचा लाभ झाला असता. त्यासाठी आम्ही या दौऱ्याचे आयोजन केले होते.
त्यासाठी सरकारने आम्हाला परवानगी दिली होती, असे काही आमदारांनी स्पष्टीकरण दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.