www.24taas.com, झी मीडिया, पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताची नौदलाची सगळ्यात मोठी विमानवाहू नौका आएएनएस विक्रमादित्य राष्ट्राला समर्पित केली. भारताची संरक्षण सिद्धता यामुळं भक्कम झालीय.
'समुद्रात एक दिवस' या नेव्हीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात दाखल झाले. नरेंद्र मोदी चार तास आएनएस विक्रमादित्यवर राहिले आणि त्यांनी नौदलाच्या संरक्षणसिद्धतेची पाहणी केली. मोदींचा पंतप्रधान म्हणून हा पहिलाच दौरा आहे. ही युद्धनौका रशियाकडून खरेदी करण्यात आली आहे. पंतप्रधान गोव्यात उतरल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
पणजीच्या किनाऱ्यावरुन हंस हेलीकॉप्टरनं पंतप्रधान विक्रमादित्यवर पोहोचले. युद्धनौकेवर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या युद्धनौकेवरील लढाऊ विमानं, युद्धनौकेवर सज्ज असलेली शस्त्रास्त्र आणि युद्धनौकेची मारकशक्ती यांची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आली.
‘मिग २९’ ह्या विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून त्यांनी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के धवन नौसेनेला संबोधित करताना मोदींनी भारत कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. 'न हम आँख दिखाएंगे और न आँख झुकाएंगे, हम आँख से आँख मिलाकर बात करेंगे' अशी भारताची भूमिका स्पष्ट केली.
भारतीय संरक्षण दलाचं मनौधैर्य वाढवणं तसचं देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती यावर भर देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजनाही सरकार राबवणार आहे. आयएनएस विक्रमादित्यवर बोलतांना मोदींनी आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केलाय.
भारतीय नौदलातील विमानं, हेलिकॉप्टर आणि पाणबुडयाची प्रात्यक्षिकेही पंतप्रधानांसमोर सादर करण्यात आली. अपघातांनी ग्रस्त असलेल्या नौदलाचं मनोधैर्य पंतप्रधानांनी भेट दिल्यानं तरी वाढावं अशी अपेक्षा व्य़क्त होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.