नवी दिल्ली : नथूराम गोडसेंवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे. नथूराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केलीय.
मात्र तरीही काँग्रेसचा साक्षी महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. साक्षी महाराज यांनी केलेल्य़ा वक्तव्य़ावर पंतप्रधानांनी निवेदन करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
साक्षी महाराज यांनी काल नथूराम गोडसे महात्मा गांधींसारखेच देशभक्त असल्याचं वक्तव्य केलं होतं.
साक्षी महाराजांच्या वक्तव्यामुळं भाजपही चांगलीच अडचणीत साप़डलीय. अशा प्रकारचं वक्तव्य करण चुकीचं असल्याचं सांगत भाजपनं याबाबत हात झटकले आहेत. तर काँग्रेसनं संधी साधत भाजपवर टीकेचा प्रहार केलाय़.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.