'सोनं घसरून पुढील 30 दिवसांत येणार 23 हजारांवर'

सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.

PTI | Updated: Jul 27, 2015, 05:13 PM IST
'सोनं घसरून पुढील 30 दिवसांत येणार 23 हजारांवर' title=

मुंबई: सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.

काय आहे घसरणीचं कारण?

विश्लेषकांनुसार अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढीची चिंता तसंच अमेरिकी डॉलर मजबूत होताच सोन्याचे दर 23 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत खाली येऊ शकतात. मार्केटमध्ये ही भीती आहे की, 29 जुलैला फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेऊ शकतात. निर्णय काय असेल हा तर आगामी काळत सांगले. पण सराफा बाजारात चढ-उतार कायम राहिल. 

याशिवाय ग्रीसवरील संकटही कमी झालंय आणि इराणनं अमेरिकेसोबत न्यूक्लिअर अग्रीमेंट पण केलंय, त्यामुळं डॉवर मजबूत होतंय.

सध्या सोनं विकू नका

इंडिया फॉरेक्सच्या विश्लेषकांनुसार सध्या सोनं विकू नये. घरगुती बाजारात सोनं नऊ महिन्यात 27 टक्क्यांनी घसरलंय आणि 24,700 रुपये प्रति 10 ग्रामवर आलंय. 

तर आनंदराठी कमोडिटीजचे रिसर्च हेड रवीद्र राव यांच्या मते सोन्याची किंमत 23 हजार रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत खाली येऊ शकते. राव यांनी सांगितलं की, चीननं सोमवारी 5 टन सोनं विकलं होतं. त्यामुळं किमतीत 4 टक्क्यांनी कमतरता आली होती. 

तर दुसरीकडे काही गुंतवणूकदार सोन्याच्या दरात आणखी घसरणीची वाट पाहत आहेत. एमसीएक्सवर शनिवारी सोन्याचा दर 24,752 रुपये प्रति 10 ग्राम आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 1097.50 डॉलर प्रति औंस होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.