नवी दिल्ली : जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने सराफा बाजारात आज सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.
पण दुसरीकडे औद्योगिक आणि शिक्के बनिवणाऱ्यांची मागणी वाढल्याने चांदी २०० रुपयांनी वाढून प्रति किलो ४१,२०० गेली आहे. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीनंतर रोख रक्कम कमी झाील आहे. त्यामुळे सोने खरेदी कमी झाली आहे.