सोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली

सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष... 

Updated: Dec 2, 2016, 07:01 PM IST
सोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली  title=

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष... 

गेल्या सोमवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल १७५० रुपयांनी घट झालेली होती. जागतिक पातळीवर आणि देशांतर्गत सराफांकडून मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किंमतीत ही घट झाल्याचं सांगण्यात येतंय. 

दरम्यान, चांदीच्या किंमतींत गुरुवारी ७३५ रुपयांची घट झाली. यासोबतच चांदीची किंमत ४१,४३५ रुपयांच्या स्तरावरून खाली येत ४०,७०० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, करन्सीच्या तुलनेत डॉलर इंडेक्स गेल्या दहा वर्षांच्या उच्चतम स्तरावर पोहचलाय. तसंच अमेरीकेतील व्याज दरांमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेत वाढ झालीय.  

आत्तापर्यंत सुरक्षित गुंतवणूक म्हणून पर्याय असलेलं सोनं आता 'सुरक्षित गुंतवणूक' राहिलेलं नाही... त्यामुळेही सोन्याच्या मागणीत घट झाल्याचं पाहायला मिळतंय.