धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.

Updated: Oct 28, 2016, 12:04 AM IST
धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी title=

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.
 
गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १५ रुपये प्रति दहा ग्रॅमची कमी दिसून आली. त्यानंतर, सोन्याच्या किंमती प्रती दहा ग्रॅम ३०,७०० रुपयांवर पोहचलीय. 

दरम्यान, चांदीच्या किंमतींमध्येही कमी येऊन प्रति किलो ३०० रुपयांनी स्वस्त झालीय. चांदीच्या किंमती प्रति किलो ४३,००० रुपयांनी कमी होऊन ४२,७०० रुपयांच्या स्तरावर पोहचलीय.