www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
जागतिक बाजारातील मंदी आणि स्थानिक बाजारात घटलेली मागणी याचा परिणाम सोने बाजारावर झाला आहे. सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूच्या भावात घट झाली. दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव २०० रुपयांनी कोसळला. त्याबरोबर सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले. औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदीच्या भावात ५१० रुपये घट झाली.
चांदीचा भाव ४५,२८० रुपये किलो झाला. न्यूयॉर्कच्या बाजारात सोने ०.८ टक्क्यांनी कोसळून प्रति औंस १२४१.५६ डॉलरवर आले. त्याचप्रमाणे चांदीच्या भावात १.८ टक्क्यांची घसरण झाली. न्यूयॉर्कमधील चांदीचा भाव प्रति औंस १९.८६ डॉलर असा झाला. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या भावात २०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.