नवी दिल्ली : १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणारे कारखाने आणि कार्यालयातील कर्मचारी आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या अंतर्गत येणार आहेत.
देशभरातील ५० लाख कर्मचाऱ्य़ांना याचा फायदा होणार आहे. श्रम मंत्रालयाने याबाबत एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशाचा फायदा या कर्मचाऱ्यांना होणार आहे. यापुर्वीच्या कायद्यानुसार २० किंवा त्याहून जास्त कर्मचारी संख्या असलेल्या कार्यालयातील लोकांनाच पीएफला लाभ घेता येत होता.
देशातील ५० लाख कर्मचाऱ्यांना पीएफचा फायदा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.