महिला अत्याचारविरोधात तामिळनाडूत `गुंडा अॅक्ट`

तामिळनाडूत महिला अत्याचारविरोधात मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीय. राज्यातील ‘गुंडा अॅक्ट’ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय जयललिता यांनी घेतलाय. तर राज्यात महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2013, 11:04 AM IST

www.24taas.com, तामिळनाडू
तामिळनाडूत महिला अत्याचारविरोधात मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीय. राज्यातील ‘गुंडा अॅक्ट’ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय जयललिता यांनी घेतलाय. तर राज्यात महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आलेय.
दिल्लीतील गॅंगरेपनंतर देशभरात संतापाची लाट उसळलीय. महिला अत्याचारविरोधात कडक कायदा करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. भाजपने कायदा करण्याबाबत काँग्रेसला सहकार्य करण्याचे आधीच जाहीर केलंय. आता तर तामिळनाडूत जयललिता यांनी बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील संबंधित आणि दोषींना कडक शिक्षा करण्यासाठी राज्यातील ‘गुंडा अॅक्ट’ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
जयललिता यांनी केंद्रातील युपीए सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या कायद्यात सुधारणा करण्याची सूचना केलीय. ही सुधारणा झाल्यास असे गुन्हे करण्याचे धाडस कोणी करू शकणार नाही, असे जयललिता यांनी म्हटलंय.
दरम्यान, बलात्कार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होण्यासाठी आणि पिडितांना त्वरीत न्याय मिळावा म्हणून तामिळनाडू राज्यात जलतगती न्यायालये स्थापन करण्याचे आदेशही जयललिता यांनी दिलेत. पिडीत महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी राज्यात महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आलेय. तर बलात्कार पीडित महिलेचा सर्व खर्च आणि तिचे पुनर्वसन सरकारकडून करण्यात येईल, अशी घोषणाही जयललिता यांनी केलीय.

ठळक बाबी
खटल्याचे कामकाज
प्रत्येक जिल्ह्यात जलगती महिला न्यायालय
खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी महिला वकील
महिला पोलीस करणार तपास
शिक्षा
गुंडा कायद्याअंतर्गत शिक्षा
मृत्यूदंडाची शिक्षा
क्रिमिनल गुन्हा नोंदविणार
बलात्कार करणाऱ्याला थेट १५ ते ३० दिवस रिमांड
आळा घालण्यासाठी
महिला हेल्पलाईनद्वारे तक्रार
महिला हेल्पलाईनसाठी एनजीओंची मदत
प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही
राज्यात महिला महाविद्यालय