गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे
रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

UP DATE - दिल्ली अपघातानंतर
रात्री ११ वाजून ४२ मिनिटे
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव विशेष विमानाने लातूरला नेण्यात येईल. तिथून मुंडेंच्या मूळ गावी बीडमधील परळी या गावात उद्या संध्याकाळी 4 वाजता, पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
रात्री १० वाजून २२ मिनिटे
गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिव अंत्यदर्शन भाजप मुख्यालयात रात्री १२ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार
रात्री ९ वाजून ०६ मिनिटे
गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव मुंबईतील भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटे
- गोपीनाथ मुंडे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते, अभिनेते, समाजकारणी, पूर्णामध्ये दाखल.

सायंकाळी ७ वाजून ४६ मिनिटे
ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिव मुंबईतील वरळी येथील पूर्णा निवास्थानी अॅम्ब्युलन्सने आणण्यात आले.

सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटे
* ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी येथील पूर्णा निवास्थानी दाखल.
- राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल पूर्णा येथे दाखल
सायंकाळी ६ वाजून ५१ मिनिटे
दिल्लीतून विशेष विमानातून गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव मुंबईत दाखल. मुंबई विमानतळावरून पूर्णा या मुंबईतील निवासस्थानी मुंडेचे पार्थिव नेणार.

दुपारी ५ वाजून ३३ मिनिटे
• अपघातात इतर दुसरा अँगल असल्यास त्याची चौकशी पोलिस करीत आहे – दिल्ली पोलिस
• घातपाताची शक्यता आहे का याची चौकशी करण्यासाठी इंटलिजन्स ब्युरोचा स्पेशल सेल स्थापन केला आहे – दिल्ली पोलिसांची कोर्टात माहिती.
दुपारी ५ वाजून १२ मिनिटे
• चालक गुरूविंदर सिंग याला पटियाला हाऊस कोर्टाने दिला जामीन. ३० हजाराच्या जात मुचलक्यावर झाली सुटका. आरोपीनेच अपघात झाल्याचे पोलिसांना कळवले होते.
दुपारी ४ वाजून ३३ मिनिटे
• चालक गुरूविंदर याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालविण्याची गुन्हा दिल्ली पोलिसांनी नोंदविला आहे. ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला या गुरूविंदरने धडक मारली होती.
• दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिवाला दिल्ली विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. त्याचे पार्थिव मुंबईसाठी रवाना झाले.
• गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल, पार्थिव मुंबईला नेणार.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन, गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.

* दिल्ली भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात पार्थिव आणणार
* दुपारी दोन वाजता पार्थिव मुंबईत आणणार
* मुंबईत पूर्णा निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनाला
* पूर्णानंतर मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात पार्थिव
* रात्रभर प्रदेश कार्यालयात अंत्यदर्शन
* सकाळी सात वाजता पार्थिव विमानानं परळीला नेणार
* परळीत उद्या संध्याकाळी साडे चार वाजता अंत्यसंस्कार

2.05 Pm - काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतलं गोपीनाथ मुंडे यांचं अंतिम दर्शन
1.50 pm - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पी. ए. संगमा, रामविलास पासवान,
1.35 pm - पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे यांनी घेतली मुंडेचं अंतिम दर्शन... मोदींनी केलं पंकजा मुंडेंचं सांत्वन
1.17 pm - मुंडे यांच्या अंतिम दर्शनासाठी दिल्लीत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, स्मृती इराणी, लालकृष्ण आडवणी, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुषमा स्वराज उपस्थित
12.30 pm - मुंडेंच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला अटक
12.15 pm - नितीन गडकरी दिल्लीच्या

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Gopinath munde of car accidents, serious injuries
Home Title: 

गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन

Author No use : 
Surendra Gangan
No
170521
No
Section: 
Authored By: 
Surendra Gangan