नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन त्यांच्या कार्यकाळातला पतधोरणाचा शेवटचा आढावा आज जाहीर करतील. पुढच्या महिन्यात राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेण्याचा प्रघात राजन यांनी सुरू केलाय. आज जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या आढाव्यात व्याजाचे दर स्थिरच राहतील असा अंदाज आहे.
यापुढच्या काळात पतधोरण निश्चितीसाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती देशाचं पतधोरण ठरवणार आहे. त्याची सविस्तर माहिती आजच्या पतधोरण आढाव्याच्या वेळी स्पष्ट होईल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे देशातल्या बँकिंग क्षेत्रात गरजेनुसार परवाने देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होतेय.
त्याच्याविषयीचा एक अहवाल रिझर्व्ह बँकेनं नुकाताच जारी केलाय. त्याविषयीही राजन अधिक प्रकाश टाकतील. याव्यतिरिक्त सरकारी बँकांमधल्या थकित कर्जाची स्थिती आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी गेल्या वर्षभरात टाकण्यात आलेल्या पावल्याविषयीही उहापोह होणं अपेक्षित आहे.