मुंबई: सर्वांसाठीच एक गुडन्यूज आहे... सोनं आता अजून स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. रिझर्व्ह बँकेनं सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्यानं आता सोन्याच्या किंमती आणखी घटण्याची शक्यता आहे.
आरबीआयनं सोनं आयातीवरी ८०:२०ची नियमावलीही रद्द केलीय. आधीच मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याचा भाव २५ हजार सातशे ९४ रुपयांवर येऊन ठेपलाय. जागतिक बाजारातही सोन्याच्या घसरणीचा कल कायम राहिलाय.
त्यामुळं आभूषण निर्मात्यांच्या मागणीतही घट झालीय. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीव क्रूड तेलाच्या दरातील घसरणीचाही परिणाम जागतीक सराफ्यावर झालाय, त्यामुळं सोन्याचे भाव गडगडलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.