www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेंशनधारकांना लोकसभा निवडणुकांपूर्वी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्याला मूळ वेतनात सामील करण्याचा निर्णय होऊ शकतो.
सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए वाढवून तो बेसिक पे म्हणजे मूळ वेतनात समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. सातव्या वेतन आयोगासंदर्भात हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कॅबिनेट लवकरच या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या निर्णयाने ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेन्शनधारकांना वेतन आयोगाद्वारे अंतरिम दिलासा देण्याचा मार्ग खुला होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. पाचव्या वेतन आयोगात ५० टक्के डीएला बेसीकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. केंद्र सरकार पुढील महिन्यात १० टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.
नियमांनुसार जेव्हा डीए ५० टक्क्यांपेक्षा अधिक होता तेव्हा तो मूळ वेतना समाविष्ट करण्यात येतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.