नवी दिल्ली : दिल्लीतलं पंतप्रधान कार्यालय आता सुपरफास्ट होणार आहे... अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही... कारण, पीएओचा इंटरनेट स्पीड समजला तर तुमची तोंडात बोटं घालण्याची वेळ येईल.
साधारणात: आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरी इंटरनेट स्पीड १० एमबीपीस आढळतो... पण, पीएमओचा इंटरनेट स्पीड आहे ३४ एमबीपीएस (मेगा बाईटस् पर सेकंड)...
भारतातला इंटरनेट स्पीड तुम्हाला माहितीच असेल... पण, पीएमओला मात्र या खराब इंटरनेट स्पीडचा काहीही फरक पडणार नाहीय. भारतात ब्रॉडब्रँड इंटरनेट स्पीड जवळपास २ एमबीपीएसच्या आसपास दिसतो. पण, पीएमओचा इंटरनेट स्पीड १७ पटीनं अधिक म्हणजेच ३४ एमबीपीएस आहे.
हा खुलासा झालाय एका आरटीआय अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेमुळे... विनोथ रंगनाथ यांनी ‘आरटीआय’द्वारे याबाबत खुलासा मागवला होता. यामध्ये, ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच एनआयसी पीएमओला ३४ एमबीपीएसच्या स्पीडनं इंटरनेट स्पीड देत असल्याचं’ सांगण्यात आलंय.
गंमत म्हणजे, इंटरनेट कॉन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क ‘अकामनी’च्या क्वॉलिटी रिपोर्ट ‘स्टेट ऑफ द इंटरनेट’नुसार इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगाभरात ११५ व्या क्रमांकावर आहे. यामध्ये, साऊथ कोरिया पहिल्या नंबरवर आहे, जिथं इंटरनेट स्पीड सगळ्यात जास्त म्हणजेच २४ एमबीपीएस आहे....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.