अहमदाबाद : होय, हे खरं आहे... यापुढे जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला १०० रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. गुजरात सरकारनं हा अनोखा निर्णय घेतलाय.
गुजरातच्या नोंदणीकृत मतदारांनी जर राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये योग्य कारणाशिवाय आपल्या मताधिकाराचा उपयोग करणं टाळलं तर त्यांच्यावर १०० रुपयांचा दंड लावण्यात येई, असं गुजरात सरकारनं जाहीर केलंय.
गुजरात सरकारनं स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान अनिवार्य केल्यानंतर राज्यात पंचायत, ग्रामीण निवास आणि ग्रामीण विकास मंत्री जयंतीभाई कवाडिया यांनी याची घोषणा केलीय. कवाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकांत मतदान अनिवार्य करणाऱ्या तरतुदीशी निगडीत गुजरात स्थानिक प्राधिकरण कायदा (दुरुस्ती) कायदा, २००९ नुसार सुट तसंच नियामांना त्यांच्या विभागानं मंजुरी दिलीय.
या कायद्यानुसार बनवल्या गेलेल्या नियमांनुसार मतदान न करणारे तसचं यासाठी कोणतंही ग्राह्य कारण न देणाऱ्या मतदारांवर १०० रुपयांचा दंड लावण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.