www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर
आसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बापूंची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार असल्यामुळं त्यांना आज पुन्हा जोधपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळं कोर्ट त्यांना जामीन मंजूर करतं, की पुन्हा कोठडी सुनावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आसाराम बापूंवर त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वकिलांनी ऑडिओ सीडी प्रसिद्ध करत मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केलाय. आसाराम बापूंच्या एक जुन्या सहकाऱ्यावर हा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता कोर्ट काय निर्णय घेतं याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.
आसाराम बापूंनी दोन दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केलाय. मागील आठवड्यात त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता. ७२ वर्षीय आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली १ सप्टेंबरला इंदूरच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.