आयपीएलच्या सट्ट्यात पत्नीला गमावलं

आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीलाच गमावल्याची घटना कानपूरमध्ये घडलीये. 

Updated: May 29, 2016, 10:21 AM IST
आयपीएलच्या सट्ट्यात पत्नीला गमावलं

कानपूर : आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीलाच गमावल्याची घटना कानपूरमध्ये घडलीये. 

महाभारतात ज्याप्रमाणे सारीपाटाच्या खेळात युधिष्ठिरने पत्नी द्रौपदीला गमावले् होते त्याप्रमाणे कानपूरमध्ये एका युवकाने चक्क आपल्या पत्नीवरच सट्टा लावला होता. 

या बेटिंगमध्ये तो हरला त्यानंतर जिंकलेल्या त्या ३० जुगाऱ्यांनी वारंवार त्या युवकाच्या घरी येऊन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर कंटाळून युवकाच्या पत्नीने पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. दरम्यान तो युवक फरार आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती रविंद्रला जुगार खेळण्याचे व्यसन होते. या व्यसनापायी त्याचे शेअर मार्केटमध्ये खूप नुकसान झाले. तब्बल सात लाख रुपयांचे कर्ज होते. नवऱ्याच्या या व्यसनापायी त्यांचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. त्यामुळे महिलेने घरात बुटीक सुरु केले आणि यातून ती घरखर्च भागवू लागली. मात्र यानंतरही पतीचे व्यसन काही सुटत नव्हते. अखेर हातातील पैसे संपल्यानंतर त्याने चक्क पत्नीवरच सट्टा लावला.