जयपूर : आग्रा-जयपूर मार्गावर भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हेमा मालिनीच्या कारने एका लहान मुलीचा बळी घेतला.
हेमा मालिनी यांच्या मर्सिडीज कारने अल्टो कारला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या अपघातात हेमा मालिनी यांच्या डोक्याला मार लागला. तर अन्य तिघे गंभीररीत्या जखमी झालेत. अपघातानंतर हेमा मालिनी यांना तातडीने जयपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हेमा मालिनीच्या ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
हेमा मालिनी आग्रा येथून जयपूरला निघाल्या होत्या. राजस्थानमधील दौसा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. प्रथमदर्शनी हेमा मालिनी यांच्या कारने चुकीच्या दिशेने गाडी चालवल्याने दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.