जयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात

ड्रीमगर्ल आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Jul 2, 2015, 11:25 PM IST
जयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात title=

जयपूर : ड्रीमगर्ल आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेमा मालिनी या जयपूरमध्ये मर्सिडीज गाडीने प्रवास करत होत्या, तेव्हा मर्सिडीज आणि अल्टो कारची टक्कर झाली. अल्टो कारमधील एका मुलीचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 
हेमा मालिनी यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, फोर्टिज हॉस्पिटलमध्ये हेमा मालिनी यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेमा मालिनी या मधुरा लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या खासदार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.