हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

देशातलं असहिष्णू शक्तींचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालयल्यानं चिंता व्यक्त होतेय. देशात सोमवारी घडलेल्या तीन घटनांमुळे हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात.

Updated: Oct 20, 2015, 12:15 PM IST
हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात  title=

नवी दिल्ली : देशातलं असहिष्णू शक्तींचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालयल्यानं चिंता व्यक्त होतेय. देशात सोमवारी घडलेल्या तीन घटनांमुळे हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात.

बंगळूरूमध्ये एका ऑस्ट्रेलियन पर्यटकानं पायावर काढलेल्या टॅटूवरून वादंग निर्माण झाला. या पर्यटकानं त्याच्या पायावर यल्लमा देवीचा टॅटू गोंदवला. तर तिकडे दिल्लीत काश्मीरमधले अपक्ष आमदार राशीद इंजिंनिअर यांना एका स्थानिक हिंदू संघटनेनी काळं फासलं. राशीद इंजिनिअर यांनी काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये बीफ पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी दिल्लीतल्या संघटनेच्या कार्याकर्त्यांनी हे पाऊल उचललं. 

इकडे मुंबईत पाकिस्तानाला विरोध करण्याच्या हेतून शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयलात घुसून गोंधळ घातला. एकूणच या तिन्ही घटनानंतर देशात अहिसहिष्णू शक्तींचा दबदबा वाढत चालल्याचं अधोरेखित होतंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.