www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमचा पासपोर्ट पुढच्या वर्षी बिनकामाचा ठरू शकतो आणि त्यामुळे तुमचा नियोजित परदेश दौरा तुम्हाला रद्द करावा लागू शकतो. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेमुळे असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरपासूनच सावध राहा.
१० वर्षांपर्यंत वैध असणाऱ्या ज्या पासपोर्टवर हातानं लिहिलेलं असेल असे पासपोर्ट नोव्हेंबर २०१५ पासून रद्द होणार आहेत.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ)च्या नियमांनुसार हा बदल करण्यात आलाय. भारत या संघटनेचा एक सदस्य आहे. या संघटनेनं केलेल्या निर्णयानुसार, जगभरातील, हातानं लिहिलेले किंवा मशीनच्या साहाय्यानं वाचता न येणारे पासपोर्ट वापरातून रद्द करण्यात आलेत.
याचाच अर्थ, ज्या नागरिकांचे पासपोर्ट हाताने लिहिलेले आहेत किंवा २० वर्षांपर्यंत वैध आहेत, अशा नागरिकाला देशातून व्हिजा मिळणार नाही. म्हणजेच २००१ पूर्वी काढण्यात आलेले सगळेच पासपोर्ट आपआप रद्द होणार आहेत. हे पासपोर्ट रद्द होऊ नयेत, यासाठी तुम्हाला हे पासपोर्ट रिन्यू करवावे लागणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.