नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत किंवा आठवड्याभरात कर्जांवरील व्याजदर कमी केले जातील, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. बँक प्रमुखांशी जेटली यांनी चर्चा केली. त्यात कर्ज स्वस्त करुन ग्राहकांचा विश्वास कमावण्याचा आणि एनपीए करण्याचा मुद्दा चर्चिला गेला.
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेली कपात काही बँकांनी ग्राहकांनाही दिली. मात्र काही बँकांनी ती दिली नाही. येत्या काही दिवसांत ही कपात होईल, असं जेटलींनी म्हटलंय. तसंच बँकांना भांडवल देण्यावर विचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
बँकांनी येत्या काही दिवसांत किंबहुना आठवडय़ात व्याजाचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले असून त्यामुळे गृह, वाहन व इतर कर्जाचे मासिक हप्ते कमी होतील, असे सूतोवाच जेटली यांनी येथे केले.
रिझव्र्ह बँकेने केलेल्या रेपो दरात कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाईल, यासंबंधाने मिळविलेले ठोस आश्वासन हे शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी येथे बोलाविलेल्या सरकारी बँका व वित्तसंस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे फलित ठरले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी आणि अन्य मुद्दय़ांवर बोलाविलेल्या बैठकीला सर्वच बँकांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.