मुंबई : तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...
आधार कार्ड पेन्शनपासून प्रत्येक फायनान्शिअल सेक्टरमध्ये अनिवार्य करण्यात आलंय. पीएफ खातं, मनरेगा, पेन्शन, जनधन योजना अशा केंद्राच्या सगळ्या सुविधांसाठी आधारकार्ड अनिवार्य आहे.
तुम्हाला हे माहीत आहे की आधार कार्ड तुम्ही तुमच्या पॅन कार्ड, बँक अकाऊंट नंबर, गॅस उपभोक्ता क्रमांक किंवा पासपोर्टला लिंक करायचा असल्यास तुम्ही हे काम घरबसल्या करू शकता. यासाठी इन्कम टॅक्स विभाग, बँक आणि आधार कार्डच्या यूआयएडीआयएनं एकत्रितपणे एक सिस्टम तयार केलंय.
तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी इन्कमटॅक्स रिटर्न फाईल करणं सोप्पं झालंय. यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे, आता रिटर्नची कॉपी बंगळुरूला पाठवण्याचीही गरज नाही.
www.incometaxindiaefiling.gov.in या लिंकवर क्लिक करा आणि आपला पॅन कार्ड नंबर टाका. एक पासवर्डही द्यावा लागेल. यानंतर आपला आधार क्रमांक टाईप करा. ई फायलिंगसाठी लिंकवर तुमचं नाव, जन्म तिथी पॅन कार्ड आणि आधार कार्डावर एकच असायला हवी.
जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तरीही तुमच्यासाठी आधारकार्ड उपयोगी आहे. ऑनलाईन-ऑफलाईन पासपोर्ट अर्जावर तुम्ही आपला आधार नंबर दिलात तर पासपोर्ट कार्यालय तुमचं व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून तुम्हाला लवकर पासपोर्ट लवकर मिळू शकतो.
एलपीजी कनेक्शनवर सबसिडी देण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर स्कीम (डीबीटीएल) सुरू आहे. एलपीजी ग्राहक नेट बँकिंगचा वापर करत असतील तर तुम्ही तुमचं आधार कार्ड याला लिंक करू शकता.
यासाठी इंटरनेट बँकिंग अकाऊंटवर लॉग इन करा इथं तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय मिळेल. यानंतरृ तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्स भराव्या लागतील. जर डीबीटीएल स्कीममध्ये हा बँक अकाऊंट नंबर दिला असेल तर आधार नंबर भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएससोबत ईमेलही येईल. यानंतर एलपीजी सिलेंडरवर मिळणारी सबसिडी सरळ सरळ तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होणं सुरू होईल.