ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी अनेक बदल, तिकिट काळाबाजाराला आता लगाम

 रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळत नव्हते. आता आयआरसीटीसीच्या नव्या सर्व्हरमुळे याला चाप बसणार आहे. रेल्वेने सर्व्हर सुरक्षेसाठी  STQCचाचणी घेतली.

Updated: Jan 20, 2016, 09:00 PM IST
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी अनेक बदल, तिकिट काळाबाजाराला आता लगाम  title=

नवी दिल्ली :  रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळत नव्हते. आता आयआरसीटीसीच्या नव्या सर्व्हरमुळे याला चाप बसणार आहे. रेल्वेने सर्व्हर सुरक्षेसाठी  STQCचाचणी घेतली.

हॅकर रेल्वे बुकींगसाठी प्रयत्न करतात. हे लक्षात घेऊन विविध सुरक्षा चाचण्या येण्यात आल्यात. त्यानंतर आयआरसीटीसीचा सर्व्हर अधिक सुरक्षित कऱण्यात आलाय. तसेच तो जलद करण्यात आलाय. कॅलिफोर्नियातील पाच उच्च टेस्टनंतर हा सर्व्हर खरेदी करण्यात आलाय.

रेल्वेच्या नवीन सिस्टीममुळे हा होणार लाभ
भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन तिकीट बुकींग सिस्टमला अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण बदल केलेत. त्यामुळे नवीन सिस्टीममुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्याऱ्यांना लगाम बसणार आहे.

तसेच सर्वसामान्य लोकांना सहज रेल्वे तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. तिकीट खरेदीसाठी आता दलालांची मदत घ्यावी लागणार नाही.

रेल्वेने आपला सर्व्हर अधिक गतिमान केल्याने एका मिनिटाला १५,०० तिकीट बुक करता येणार आहे. आधी ७२०० तिकीट बुक करता येत होती. तसेच १ लाख २० हजार लोक एकाचवेळी बेबसाईटवर लॉगऑन करु शकतात.

पुढच्या दिवाळीपर्यंत ३ लाख लोक एकाचवेळी लॉगऑन करु शकतात. तसे प्रयत्न सुरु करण्यात येत आहेत. स्वयंचलित तिकीट बुकिंग वापरून आयआरसीटीसी मार्ग सॉफ्टवेअर आटोक्यात आणण्यासाठी अनेक बदल केले आहेत. 

हे आहेत रेल्वे बुकींगचे बदल :
1. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅप्चा लावण्यात आला आहे. या नोंदी स्वयंचलित पद्धतीने शकत नाही.
2. ई-मेल आयडी एकच नोंदणी होईल.
3. एकाच मोबाइलने नोंदणी होईल. वन टाईम पासवर्ड पाठविला जाईल.
4. प्रवाशी आरक्षण किमान वेळ निश्चित करण्यात आली आहे.
5. पेमेंट करण्यासाठी किमान वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
6  तत्काळ तिकिटासाठी 10 ते 12 तास एक आयडीवर दोन तिकीट दिले जाईल.
7. एकाच युजरला महिण्यात १० तिकीट  बुक करता येतील. 
8. एकाच लॉगइनवर तत्काल तिकीट असेल.तसेच रिटर्न तिकीट काढता येईल.
9. एक IPअॅड्रेसवर दोन तिकीट मिळतील.
10. नेट बँकिंगला वन टाइम पासवर्ड सर्व बॅंकाना अनिवार्य करण्यात आलाय. 
11. कॅप्चासाठी लॉगइन, आरक्षण फॉर्म आणि पेमेंट पानावर असेल.