सुनंदा पुष्कर मृत्यू : ते तिघे कोण होते?

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन संदिग्ध लोकांचा शोध सुरू आहे.

Updated: Nov 18, 2014, 01:34 PM IST
सुनंदा पुष्कर मृत्यू : ते तिघे कोण होते? title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन संदिग्ध लोकांचा शोध सुरू आहे.

१३ जानेवारी ते १८ जानेवारी या दरम्यान हे तीन संशयित त्याच हॉटेलमध्ये थांबले होते ज्या हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू जाला होता. 

हे तीन जण खोट्या पासपोर्टची माहिती देऊन हॉटेलमध्ये उतरले होते, असं सांगितलं जातंय. या तिघांच्या शोधार्थ दिल्ली पोलिसांची एक टीम दुबईला जाणार आहे. 

'एम्स'च्या मेडिकल बोर्डानं नुकताच आपला दुसरा एक रिपोर्ट पोलिसांकडे सोपवलाय. यामध्येही सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचं सांगितलं होतं पण कोणत्या पद्धतीचा हा विषप्रयोग होता, याचा मात्र उल्लेख या रिपोर्टमध्ये नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, दिल्ली पोलीस माजी केंद्रीय मंत्री शशी शरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नमुने परदेशात फॉरेन्सिक प्रयोगशाळेत धाडले जाऊ शकतात.

सुनंदा यांचे तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप याआधीच गुजरातच्या गांधीनगर स्थित एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या डिव्हाईसमधून काही गोष्टी डिलीट करण्यात आल्यात का? हे यातून समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय.  

सुनंदा यांचा मृतदेह याच वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण दिल्ली स्थित हॉटेल लीला मधील एका रुममध्ये आढळला होत्या.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.