स्मार्टफोनचा पासवर्ड दिला नाही म्हणून 'त्या'ने केली पत्नीची हत्या

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये स्मार्टफोनशी निगडीत असे प्रकरण समोर आलेय जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. पत्नीने स्मार्टफोनचे लॉक खोलण्यासाठी पासवर्ड दिला नाही म्हणून पतीने हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेय.

Updated: Sep 9, 2016, 08:17 AM IST
स्मार्टफोनचा पासवर्ड दिला नाही म्हणून 'त्या'ने केली पत्नीची हत्या title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये स्मार्टफोनशी निगडीत असे प्रकरण समोर आलेय जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. पत्नीने स्मार्टफोनचे लॉक खोलण्यासाठी पासवर्ड दिला नाही म्हणून पतीने हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेय.

पोलिसांच्या माहितीनुसार, पूनम वर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. 29 ऑगस्टच्या रात्री तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. जेव्हा तिची लहान 4 वर्षांची मुलगी रडू लागली तेव्हा हत्येची माहिती मिळाली. 

याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आलीये. आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केलाय. विनितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 
नोकरीच्या निमित्ताने मी कानपूरला ये जा करत असे. गेल्या महिन्यात पत्नीला नवीन स्मार्टफोन खरेदी करुन दिला. मात्र स्मार्टफोन घेतल्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती माझ्याकडे आणि मुलीकडे दुर्लक्ष करु लागली. तसेच तिचा फोनही नेहमी लॉक असे. 

पत्नीवर संशय आल्याने विनितने तिच्या हत्येचा कट रचला. आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याने ही हत्या घडवून आणली.