नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन दिला तलाक

ट्रिपल तलाकचा वाद चर्चेत असतानाच ट्रिपल तलाकची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आलीय. 

Updated: Apr 24, 2017, 06:40 PM IST
नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन दिला तलाक title=

हैदराबाद : ट्रिपल तलाकचा वाद चर्चेत असतानाच ट्रिपल तलाकची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आलीय. 

हैदराबादमध्ये राहणा-या सुमैनाला तिचा नवरा ओवौस तालिबनं व्हॉटसअॅपवर तलाक पाठवलाय. सुमैनाचं लग्न झाल्यानंतर तिचा नवरा आणि सासू तिला नोकरासारखं वागवत होते... तिला नीट खायलाही देत नव्हते.... 

धक्कादायक बाब म्हणजे सुमैनाच्या सासूनं सुमैनाला सास-याबरोबर शरीरसंबंध ठेवायला भाग पाडलं... सुमैनानं नकार देताच तिला सहा दिवस कोंडून ठेवण्यात आलं. त्यानंतर सुमैनाचे वडील येऊन तिला घेऊन गेले..... त्यानंतर सुमैनानं नव-याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याशी कुठलाही संवाद न साधता त्यानं व्हॉ़टस अॅपवरुन तलाक देऊन टाकला.