नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे, "मी, सच्चा मुस्लिम असून, प्रेषित मोहम्मद पैगंबर हे योगाचे मोठे समर्थक होते".
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे इस्लाममध्ये सर्वांत मोठे नाव आहे. माझ्या मते ते सर्वांत मोठे योगी होते. ज्याच्यामध्ये ‘इमान‘ आहे तो मुस्लिम आहे. मी, सच्चा मुस्लिम आहे', साक्षी महाराज पत्रकारांशी बोलत होते.
‘सूर्य जर नसेल तर सर्वजण आंधळे होऊ, संपूर्ण जगच अंधारात लोटले जाईल. जे कोणी सूर्याला मानत नाहीत. त्यांनी सूर्य प्रकाश घेणे बंद करावे. आपण सर्वजण भारतीय संस्कृतीत वाढलो आहोत, त्यामुळे येथे अल्ला, भगवान आणि देवामध्ये कोणताही फरक नाही. मी, अल्ला-हू-अकबर बोलू शकतो.
परंतु, उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांच्यामध्ये ताकद असेल तर त्यांनी जय श्रीराम बोलून दाखवावे.' असं आव्हानंही यावेळी साक्षी महाराज यांनी दिलं.
काही मुस्लिम संघटनांनी योगाला विरोध केला आहे. तसेच योग दिनाच्या अगोदर भाजपचे विविध नेते वादग्रस्त वक्तव्य करू लागले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.