नवी दिल्ली : हिंदूनी चार मुलांना जन्म द्यावा, या वादग्रस्त विधानावर भाजपने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, आपल्याला नोटीस मिळाले नसल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटलेय.
भाजप खासदार साक्षी महाराज आपल्याच विधानामुळे दिवसेंदिवस अडचणीत येतातय. वादग्रस्त विधानावर आता भाजपनेच आता साक्षी महाराज यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलय. हिंदूनी चार मुलांना जन्म द्यावा या विधानावर चहूबाजूने साक्षी महाराज आणि भाजपावर टीका झाली होती.
दरम्यान अमित शाह यांनी ते विधान साक्षी महाराज यांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे स्पष्ट केलं. आहे. ही पक्षाची भूमिका नाही असं सांगत पक्षानं साक्षी महाराजांच्या विधानावरुन हात झटकलेत. तर साक्षी महाराज यांनीही अशी नोटीस मिळाली नसल्याचे म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.