'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे'

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.

Updated: Jan 13, 2015, 12:17 PM IST
'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे' title=

भिलवाडा : भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.

एका सभेत बोलतांना साध्वी प्राची म्हणाल्या, पूर्वी आपण 'हम दो हमारे दो' असे म्हणत होतो, आता "शेर का बच्चा एकही अच्छा' असे म्हणू लागलो आहोत, हे चूक आहे. एकच मुलगा असेल, तर त्याला कोठे पाठवाल? सीमेचे रक्षण करायला, समाजसेवा करायला, शास्त्रज्ञ व्हायला की व्यापार करायला? म्हणून या सर्वांसाठी एक एक मुलगा असणे आवश्‍यक आहे. 

समाजसेवा आणि संस्कृतीरक्षण करण्यासाठी एक मुलगा विश्‍व हिंदू परिषदेला द्या. हे फार महत्त्वाचे आहे. साध्वी प्राची यांनी या वेळी 'घर वापसी' कार्यक्रमाचेही समर्थन केले. मुझफ्फरनगरमध्ये २०१३ ला झालेल्या एका सभेत द्वेषमूलक भाषण केल्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.