नवी दिल्ली: शिवसेना खासदारांनी केलेला प्रकार निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर महाराष्ट्र सदनात खरोखरंच गैरसोयी असून त्यावर तातडीनं उपाय योजायला हवेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय.
रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याच्या प्रकरणाचे लोकसभा आणि राज्यसभेतही पडसाद उमटायेत. मात्र आम्ही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नाहीत. आम्ही हिंदूत्ववादी पण अन्य धर्मियांचा द्वेष करत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलीय. तर चपाती खाऊ घालणाऱ्या शिवसेना खासदार राजन विचारेंनी माफी मागितलीय.
या सर्व प्रकरणाला धार्मिक रंग दिला जातोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी आपल्याला कसा अनुभव महाराष्ट्र सदनात आला हे सांगून, वाद घालण्यापेक्षा त्यावर उपाय योजना करायला हव्यात असं म्हटलंय. मला चहा द्यायला तब्बल एक तास तिथल्या कॅटरिंगनं लावल्याचं दलवाई यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.