नवी दिल्ली : माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 100 मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण भारतानं पाकव्याप्त काश्मीरवर जो सर्जिकल स्ट्राईक करण्याची इच्छाशक्ती दाखवली त्याबद्दल मी मोदींना सॅल्युट करतो, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
आम आदमी पार्टीनं केजरीवालांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना घेऊन पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक झालेल्या ठिकाणी जात आहे आणि असा कोणताच प्रकार घडल्याचा दावा करत नाही. मोदींनी पाकिस्तानचा बुरखा फाडावा, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असंही केजरीवाल म्हणाले आहेत. तसंच पाकिस्तानच्या या दाव्यावर विश्वास ठेवायची गरज नसल्याचं वक्तव्य केजरीवालांनी केलं आहे.
As we fight Pakistan on Ground, we must fight their propaganda as well.
Watch @ArvindKejriwal's appeal to Modi ji. #AKBacksModiOnPak pic.twitter.com/Y7oJGZVzk6
— AAP(@AamAadmiParty) October 3, 2016