मी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू

धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 18, 2013, 09:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय. या पाण्यामुळे रोगराई बरी होते, असं त्यांचं म्हणणंय. इतकंच नाही तर NGO चं हे आपल्याविरोधात कारस्थान असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान नवी मुंबईत आसारामबापूंनी पाण्याची नासाडी रेल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलेत. त्याचबरोबर मीडियाबरोबर मुजोरी करणा-या आसाराम बापूंच्या भक्तांवरही कारवाई करण्यात आली आहे. पत्रकारांवर हल्ला केल्याप्रकरणी बापूंच्या तीन मुजोर अनुयायांना अटक करण्यात आलीय. पाण्याच्या नासाडीविरोधात आवाज उठवणा-या मीडियावरच बापूंच्या भक्तांनी दगडफेक केली होती.

पाण्याच्या नासाडीला विरोध करण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतल्या पटनी मैदानावर आंदोलन केलं. यावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि बापू भक्तांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर या मुजोर बापू भक्तांनी मीडियावरही हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी आसाराम बापूंच्या तीन मुजोर अनुयायांना अटक करण्यात आलीय.