आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे. 

Updated: Jan 2, 2017, 08:26 PM IST
आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात title=

मुंबई : नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे. 

०.७ टक्क्यांनी व्याज दरात कपात केली आहे. पंतप्रधान मोदींनी बंकांना आवाहन केलं होतं की गरीबांना आणि लोअर मिडल क्लास वर्गाला लोन देण्यासाठी खास लक्ष द्या. पीएम मोदींच्या या आवाहनानंतर रविवारी SBI ने 0.9 टक्के, PNB ने 0.7 टक्के, यूनियन बँकेने 0.65 टक्के व्याज दर कमी केलं आहे.  

SBI,PNB आणि यूनियन बँकेच्या या पाऊलानंतर देशभरातील इतर बँकांवर देखील व्याज दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे.