मुंबई : मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने 'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.
आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये अनन्या पटवर्धने हिने ५०० पैकी ४९६ गुण मिळविले आहेत. अनन्या पार्ल्याच्या छत्रभुज नरसी मेमोरिअल स्कूलची विद्यार्थिनी आहे.
मुंबईच्या गोकुळधाम शाळेचा अनिश दीक्षित देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'आयसीएसई' बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा अर्क्य चॅटर्जी याने ९९.७५ % गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.
'आयसीएसई' बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाने विद्यार्थ्यांना निकाल बघण्याची www.cisce.org या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.