नवी दिल्ली : मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.
मोबाईलवर बोलत असताना मध्येच फोन कट झाला तर चालू कॉलसाठी मोबाईल कंपन्यांनी १ रुपया त्या कॉलसाठी भरपाई द्यावी, असा महत्वपूर्ण निर्णय देताना कंपन्याना तसा आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने दिलाय.
ही भरपाई केवळ एका दिवसात तीन कॉलसाठी असेल. त्यापेक्षा जास्त कॉलसाठी मिळणार नाही, असेही ट्रायने स्पष्ट केलेय. भरपाईबाबतचा निर्णय लवकरच अमलात येणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केलेय. मोबाईल कंपन्या कॉल ड्रॉपची भरपाई देत नाहीत, म्हणून हा तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आलेय.
दरम्यान, सरकार चौकशी करीत असले तरी ट्रायच्या ताज्या अहवालामध्ये कॉल ड्रॉप होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झालेय. कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाणात घट होताना दिसत नसल्याने ग्राहकांनी चिंता व्यक्त केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.