close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक

इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय. 

Updated: Oct 15, 2015, 09:28 PM IST
बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक

नवी दिल्ली : इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय. 

या माध्यमातून देशाला नुकसान पोहचवू शकणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. हा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला गेला ज्यामध्ये दूरसंचार, गृह मंत्रालय आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सीजचे अधिकारी सहभागी झाले होते. 

ही बैठक भारतीय कम्प्यूटर आपात प्रतिक्रिया दल सीईआरटी-इननं बोलावली होती. हे दल संचार मंत्रालयाच्या अंतर्गत एक नोडल एजन्सी आहे जी हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवते. 

या बैठकीत इस्लामिक स्टेट आणि इराक अॅन्ड सीरिया संबंधित दोन वेबसाईटसना ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दोन वेबसाईटचे फेसबुक पेजही ब्लॉक करण्यात आलेत. हे फेसबुक पेज कश्मीरमधून काही अज्ञात लोक अपडेट करत होते. 
 
बंदी घालण्यात आलेल्या दोन्ही वेबसाईटवर बॉम्ब कसा बनवला जातो तसंच संघटनेच्या प्रशिक्षण मोड्युलचाही समावेश होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारनं यंदाच्या वर्षात दहशतवादी कारवायांशी संबंधित जवळपास ५५-६० वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईटची पेजेस ब्लॉक केलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.