नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, जर तुम्हाला कामं करायची नसतील, तर कृपया व्हीआरएस घ्या, पण सरकारच्या कामात अडथळा आणू नका.
भारतात अनेक देश गुंतवणुकीसाठी तयार आहेत, यासाठी चांगले रस्ते महत्वाचे आहेत, रस्त्यांसाठीही ते गुंतवणूक होणार आहे, दिवसाला शंभर किलोमीटर हायवे बनवण्याचं सरकारचा उद्देश आहे, त्या कामात फाईली धूळ खात पडतील तर कसं होईल.
आमचा कारभार लालफितीत अडकायला नको, म्हणून कृपया ज्यांना काम करण्यात रस नसेल, त्यांनी व्हीआरएस घ्यावा, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.