गांधी जयंतीच्या आधी नरेंद्र मोदी झालेत साबरमतीचे संत

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी. मात्र, आज १ ऑक्टोबरला भाजप खासदार विजय गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांची तुलना केलेय. मोदी हे सांबरमतीचे संत आहेत, असा उल्लेख असलेले फलक लावण्यात आलेत.

Updated: Oct 1, 2015, 10:43 PM IST
गांधी जयंतीच्या आधी नरेंद्र मोदी झालेत साबरमतीचे संत title=

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी. मात्र, आज १ ऑक्टोबरला भाजप खासदार विजय गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांची तुलना केलेय. मोदी हे सांबरमतीचे संत आहेत, असा उल्लेख असलेले फलक लावण्यात आलेत.

राजस्थानमधून गोयल हे राज्यसभेचे खासदार आहेत. दिल्लीतील अशोक रोड येथील त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोदी यांचे मोठे फलक लावलेत. यामध्ये मोदी यांना साबरमतीचे संत म्हणून उल्लेख केलाय. या फलकावर मोदी आणि गांधी यांचा फोटोही आहे.

नवी दिल्लीत भाजप पक्षाच्या मुख्यालयासमोर गोयल यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थाच्या बाहेर हे मोठे फलक लावलेत. तसेच याबाबत ट्विटही केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.