नवी दिल्ली : ‘आप’नं भारताची राजधानी असलेल्या दिल्लीवर ऐतिहासिक विजय मिळवल्याचं आता स्पष्ट झालंय. दिल्लीतला आजवरचा हा सर्वांत मोठा विजय ठरलाय. 'आप'ला जवळवपास ९४% जागा खेचून आणल्यात...
तर दुसरीकडे गेली अनेक वर्ष इथं सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. हा काँग्रेसचा निच्चांकाचा रेकॉर्ड आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. भाजपला तर विरोधी पक्षनेतेपद मिळणंही कठीण दिसतंय. मोदी लाटेला 'आम आदमी'नं चांगलाच तडाखा दिलेला या निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होतंय.
आपच्या विजयाला दिल्लीकरांना दिलेली १० आश्वासनं कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.. कोणती आश्वासनं आपनं दिली होती ते पाहूया...
पाहुयात, अरविंद केजरीवाल आणि 'आप'नं दिल्लीकरांना आश्वासनं
दिल्लीकरांना स्वस्त वीज आणि पानी
दिल्लीत स्वच्छ आणि स्वस्त पाणी कायदेशीर अधिकार
दिल्लीत जिथे झोपडी तिथे घर
संपूर्ण दिल्लीत वाय-फाय
दिल्लीत सुरक्षेसाठी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे
दिल्लीत खाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण
दिल्लीत दोन लाख जन शौचालय
दिल्लीत २० नवीन कॉलेज
दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये ३० लाखाहून अधिक बेड
दिल्लीतील युवकांना आठ लाख नवीन नोकऱ्या
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.