येमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो

येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये. 

Updated: Apr 10, 2015, 11:55 AM IST
येमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो title=

नवी दिल्ली: येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये. 

तर इतर देशातील ९६० नागरिकांना भारतीय सैनिकांनी सुखरुप त्यांच्या मायदेशी पाठवलंय.  

केंद्राच्या या मोहिमेचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह हिरो ठरलेत. मुंबई विमानतळावर व्ही. के. सिंह यांचं पोस्टर घेऊन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात येमेनमधून येणाऱ्या भारतीयांचं स्वागत केलं. 

देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिलीये. केंद्र सरकारनं तत्परतेनं राबवलेल्या मोहिमेंचं कौतुक केलंय. भारताच्या या मोहिमेचं जगभरातून कौतुक झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.