www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, इराक त्यानंतर भारतात झाल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार अफगाणिस्तान आणि सीरिया यांच्यापेक्षाही सर्वात जास्त बॉम्बस्फोट भारतात होतात हे स्पष्ट झाले आहे.
या अहवालानुसार भारताचा तिसरा क्रमांक आहे. भारतीय नॅशनल बॉम्ब डेटा सेंटरने (NBDC) जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांचा अभ्यास करुन अहवाल सादर केला आहे.
या अहवालानुसार २०१३ मध्ये भारतात २१२ बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये १३० जणांचा मृत्यू आणि ४६६ जण जखमी झाले होते. मात्र अफगणिस्तानमध्ये १०८ बॉम्बस्फोट झाले. देशांत २०१३ मध्ये २४१ बॉम्बस्फोट झाले होते. त्यात मृतांचा आकडा ११३ होता तर ४१९ जण जखमी झाले होते.
बॉम्बस्फोटांचे प्रमाण जम्मू-काश्मीर, झारखंड, मेघालय, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांत वाढले आहे. मात्र मणीपूर, बिहार, छत्तीसगड, आसाम आणि तामिळनाडू यांसारख्या १५ राज्यात बॉम्बस्फोट कमी झाले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.